जळगावताज्या बातम्यामहापालिका

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

| लोकमाध्यम NEWS | जळगाव (प्रतिनिधी) : शाश्वत आणि विकसित शहरांच्या निर्मितीसाठी मुंबई येथे आयोजित ‘३ री वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या जागतिक परिषदेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशातील आणि परदेशातील विविध शहरांच्या महापौरांशी संवाद साधतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. या जागतिक अनुभवांचा उपयोग जळगाव शहराच्या नियोजनबद्ध, स्वच्छ आणि शाश्वत विकासासाठी होणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, विविध राज्यांचे मंत्री, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ‘एआयआयएलएसजी’चे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांच्यासह अनेक देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहरांच्या विकासातील महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका अधोरेखित केली.“शहरे ही विकासाची इंजिने असून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था ही विकसित भारताची पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन करत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरी परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन मांडला.

तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये विचारमंथन

परिषदेच्या पहिल्या दिवशी महापौर दीपमाला काळे यांनी नागरी विकासाशी संबंधित तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला.

*अर्बन इंडिया @ २०४७*: २०४७ मधील भारतातील शहरांची संकल्पना, भविष्यातील शहरी विकास आणि आधुनिक शहरांची उभारणी यावर चर्चा झाली.

मेयर्स राउंड टेबल टॉक : महापौरांच्या सहभागातून शहरांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने आणि विकासाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले.शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी: कचऱ्याचा पुनर्वापर आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’च्या माध्यमातून कचरा समस्येवर शाश्वत उपाययोजना कशा राबवता येतील, याचे धडे तज्ज्ञांनी दिले.

“जागतिक स्तरावरील मान्यवर, तज्ज्ञ आणि विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधून अनेक आधुनिक कार्यपद्धती जाणून घेता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि या परिषदेतील जागतिक अनुभव जळगाव शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील.”

— दीपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव महानगरपालिका

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button