जळगावकृषीमहाराष्ट्र

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगाव येथे आज उद्घाटन; शेतमजुरीला पर्यायी कृषी यंत्र ठरणार आकर्षण

लोकमाध्यम न्युज | जळगांव २९ नोव्हेंबर २०२४ |

जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या नऊ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. निर्मल सीड्सचे डॉ. जे. सी. राजपूत, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नमो बायोप्लांटचे पार्श्व साभद्रा, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, कृषीदूतचे डॉ. रामनाथ जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

शेतकऱ्यांना शेतमजूर ही समस्या सध्या सर्वात जास्त भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल 40 हून अधिक तर एकूण 200 पेक्षा अधिक स्टॉल्स असतील. 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यानच्या या चार दिवसीय तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. क्षारमुक्त पाण्याचा (RO) वापर करून वाढवा शेतीचे उत्पादन, झटका मशीन, सोलर वरील शेतीपंपाचा डेमो यासह शासनाचा कृषी विभाग बँक शेतीविषयक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध असतील. शहरी शेती अर्थात टेरेस गार्डन तसेच घरगुती बागेसाठी उपयुक्त साधने, किचन-गार्डनिंग टूल्सही या प्रदर्शनात उपलब्ध असतील.

अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित या कृषी प्रदर्शनासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, नमो बायोप्लांट्स प्रायोजक आहेत. प्लॅन्टो कृषी तंत्र, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी व श्रीराम ठिबक सहप्रयोजक आहेत.

मोफत भाजीपाला बियाणे व आरोग्य तपासणी

निर्मल सीड्सतर्फे पहिल्याच दिवशी प्रदर्शनास येणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर गोदावरी फाउंडेशनतर्फे पुरुष तसेच महिला शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन स्थळीच प्राथमिक आरोग्य तपासणी चारही दिवस मोफत असेल, असेही आयोजकांनी सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button