लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ३ ऑगस्ट २०२४ |
जळगाव जिल्हा(लोकसभा)राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी पक्ष महिला संघटन कार्याचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ महिला पदाधिकारी कल्पनाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा
रुपाली निलेश चाकणकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात
आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जळगांव लोकसभा महिला “जिल्हाध्यक्षा” पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील रहाल. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा देत निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.