लोकसभा निवडणुक
जळगाव जिल्ह्यातील मशाल रॅलीची “इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद
जळगाव दि.१४ मे २०२४ : जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांच्या प्रचारार्थ एकाच दिवशी एकाच वेळी जिल्ह्यात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मशाल रॅलीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने उच्चांक केला असून, एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरात एकाच वेळी काढण्यात आलेल्या या रॅलीची नोंद इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
या मशाल रॅलीमध्ये जळगाव जिल्ह्यातील १० शहरं व ९०० पेक्षा अधिक ग्रामीण गावांमध्ये २१००० पेक्षा जास्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदारांनी मशाल रॅलीत सहभाग नोंदवला. या मशाल रॅलीची नोंद इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली असून याबाबत प्रमाणपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.