लोकसभा निवडणुक

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण

मतमोजणी कक्षात मोबाईलवर सक्त बंदी,पारदर्शक आणि शांततेसाठी उमेदवारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जळगांव दि.३१ मे २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे.मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल.

८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

गुरुवार दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल.मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही.मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीं समोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आवाहन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे.किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणूकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.या साठी २७ जून रोजी अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.तर ३० जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button