जळगावक्रीडा

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २१ : पाॅण्डिचेरी येथे सुरू असलेल्या १६ वर्षा आतील ४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सोनल वाल्मिक हटकर हीची बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली.

सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती व नुकतीच मेल मालदीव्स येथे आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्प साठी भारतातुन चार महिला पंचांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सोनलच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के. सी. ई. सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा, यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, अमर हटकर, रविंद्र धर्माधिकारी व समस्त क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button