जळगाव दि.२३ : मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे होळी व धुलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कचर्याची होळी पेटविण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक रंग खेळत रंगपंचमी साजरी केली.
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष- शामकांत सोनवणे, मुख्याध्यापक मुकेश नाईक उपस्थित होते.
यावेळी होळी सणाचे महत्व उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी तयार करीत ती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक ,अर्चना नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी पूजा-अर्चना करीत होळीला वंदन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरे केले. एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. प्रसंगी विद्यार्थिनीनी उत्कृष्ट नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.
सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोळी यांनी तर आभार उज्वला नन्नवरे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.