लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ७ ऑगस्ट २०२४ |
पानिपत येथे 14 जानेवारी 2025 रोजी पानिपत मराठा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानीपत व शौर्य यात्रा कंपनी तर्फ अडीच हजार रुपयांत पानीपत दर्शन यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रीय समन्वयक मिलींद पाटील आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पडोळे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
पानीपत येथील लढाई मराठे हरले नाहीत . या लढाई साठी महाराष्ट्रातील लाखो मराठे हजारो किलो मिटर चा प्रवास करून गेले होते . लढाईनंतर स्व रक्षणार्थ त्यांनी रोडे मराठा पाटील असे नाव धारण करत तेथेच स्थायिक झालेत . अनेक शूर वीरांच्या शौर्यचे प्रतिक असलेल्या या पानिपतच्या रणक्षेत्राचे दर्शन घडावे म्हणून शौर्य यात्रा कंपनीतर्फे अडीच हजार रुपयात पानिपत शौर्य दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्यासाठी नोंदणी सुरू केलेली आहे अडीच हजार रुपयात रेल्वेने पाणीपत जाणे आणि तिथून परत येणे यासह जेवणा खाण्याचा व राहण्याचा राहण्याची व्यवस्था शौर्य यात्रा कंपनीतर्फे करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली
यावेळी मराठा जागृती मंचाचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील, शौर्य यात्रा कंपनीचे आयोजक नामदेव वाघ, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पडोळे, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय जाधव ,संभाजी चव्हाण, शिवाजी शिंदे,बाळासाहेब मते, साहेबराव कांडेकर,देवानंद मराठे, राजु मोरे आदी उपस्थित होते.