जळगांव जिल्हासामाजिक

समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी : संदीप घोरपडे

जिल्हा पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ७ जानेवारी २०२६ : समाजाचे अधःपतन होत असून आज पत्रकारांनी समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका घ्यावी असे प्रतिपादन संदीप घोरपडे यांनी आज पत्रकार भवन येथे केले. मराठी पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महनीय वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील हे होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर व डॉ. सुधीर भटकर है होते.घोरपडे पुढे म्हणाले कि समाजात गरीब व श्रीमंतांची दरी अधिकाधिक वाढत आहे वृधांश्रामाची संख्या वाढत आहे हि चिंताजनक बाब आहे मनरेगा योजनेचे बदल स्वरूपाचे रहस्य उलगडले, लोकशाही चे रक्षण करण्याची जबाबदारी हि पत्रकारांची आहे.

आपले भाषणाचा समारोप करतांना पत्रकार भवनाच्या दुरुस्तीसाठी रु. ५५,५५५/- रुपयांची देणगी घोषित केली. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांचे शुभारंभ झाला.प्रास्ताविक श्री विजय बापू पाटील यांनी पत्रकार संघाची वाटचाल संघातर्फे पत्रकारांना व कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देणे, सन्मान तसेच शासन दरबारी सुरु असलेले प्रयत्न व हीरक महोत्सवी निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

डॉ. सुधीर भटकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर यांनी समुयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रमोद पाटील यांनी केले, सूत्रसंचालन देविदास वाणी, उपस्थितांचे आभार अशोक भाटीया मानले, भागवत पाटील यांनी पसायदान सादर केले.

कार्यक्रमास श्री कमलाकर वाणी अनंत वाणी, जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरएल हॉस्पिटल, रेडक्रॉस सोसायटी, मुक्ती फौंडेशन, सारंग भाटीया, ऑड रजनीश राणे, तेजमल जैन, ऑड विश्वासराव भोसले, मुकुंद गोसावी, डॉ. नितीन धांडे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमापूर्वी जिल्हा पत्रकार संघाची सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत पत्रकार संघाची पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यांची घोषणा श्री विजय बापू पाटील यांनी जाहीर केली ती पुढील प्रमाणे.

पदाधिकारी यांची निवड :पत्रकार संघ अध्यक्ष श्री प्रमोद अण्णा पाटील, ग्रामीण अध्यक्ष भिका भाऊ चौधरी, महानगर अध्यक्ष श्री विवेक खडसे, कार्याध्यक्ष: पांडुरंग महाले, सरचिटणीसः दिलीप शिरुडे

भवन समिती अध्यक्ष श्री दिपक नगरे रावेर, सचिव सारंग भाटिया, जिल्हा संघटक श्री मोतीलाल जोगी सर, खजिनदार श्री फारुख शेख, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र देशमुख, श्री देविदास वाणी, श्री सचिन सोमवंशी, भरत चौधरी धरणगाव, राजेश यावलकर, सुरेश पाटील यावल, चरणसिंग पाटील. सहचिटणीस डॉ नलीन महाजन, अरुण मोरे

छायाचित्रकार अध्यक्ष श्री गोकुळ सोनार,

एरंडोल तालुका अध्यक्ष श्री बी एस चौधरी

जामनेर तालुका अध्यक्ष : श्री तेजमल जैन

पत्रकार संघ कार्यकारिणी व भवन समिती कार्यकारिणी नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button