जळगांव जिल्हाक्रीडा

जिल्हा क्रीडा संकुलात टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकमाध्यम न्युज | जळगाव २९ ऑगस्ट २०२४ |

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचा गुरुवारी शुभारंभ झाला.
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कु.व्ही. केजो,माजी आमदार मधु जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून केंद्राचा शुभारंभ केला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तलवेलकर,फारूक शेख, असोसिएशनचे सचिव विवेक आळवणी, राजेश जाधव, इकबाल मिर्झा आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सहसचिव राजु खेडकर यांनी केले.असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सहसचिव सुनील महाजन ह्यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या.
सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत बेसिक, इंटर्मिजीएंट व ऍडव्हान्स ट्रेनिंग याचबरोबर योगा आणि फिटनेस संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षक आकाश कासार हे खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. तरी खेळाडूंनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button