आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !
लोकमाध्यम न्युज | जळगाव १३ ऑक्टोबर २०२४ |
धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे हे सभागृह बांधण्यात येणार आहे.
धरणगावातील मातोश्री कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या गुप्ता गल्लीत समस्त आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे नुकतेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी समस्त पंचमंडळांनी प्रतापराव पाटील यांचा सत्कार केला. गेल्या महिन्याभरापूर्वी या सभागृहासाठी नगर उत्थान या योजनेच्या माध्यमातून 21 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हे सभागृह बांधण्यात येणार आहे.
या भूमिपूजन वेळी शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, भानुदास विसावे, नगरसेवक अहमद पठाण, शिवसेनेचे सरसंघटक धिरेंद्र पुरभे, अध्यक्ष आनंद फुलपगार, उपाध्यक्ष कमलेश बोरसे, सचिव गोपाल फुलपगार, खजिनदार राजेंद्र फुलपगार, सतिष बोरसे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.