
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १८ फेब्रुवारी २०२५ |
शिरसोली रोड वरील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज मंदीर जीवन मोती सह.सोसायटी येथे श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रगटदिनाचा आदल्या दिवशी दि. १९ बुधवार रोजी संध्या. ५.०० ते रात्री ९.०० वाजे पर्यत श्रीगजानन महाराज मुर्तिची शोभायात्रा निघणार आहे.
गुरुवार दिनांक २० रोजी
सकाळी ६.३० वा. श्री.मुर्तिचा अभिषेक
सकाळी ७.३० वा. महाआरती होईल आरती झाल्यावर प्रसाद वाटप होईल
सकाळी १० ते ११.३० वाजे पर्यत ह.भ.प.
ऋषीकेश जोशी यांचे प्रवचन होईल
दुपारी १२.०० वा. महाआरती लगेच महाप्रसादाचे ३.०० वाजे पर्यत वाटप होईल
संध्याकाळी ५.०० ते ७.०० वा. स्वरांजली गृप यांचे भक्तीगीताचा कार्यक्रम होईल
संध्या .६.०० पासुन ते रात्री १०.०० वाजे पर्यत महाप्रसादाचे वाटप होईल
संध्याकाळी ७.३० वा. महाआरती होईल
रात्री ८.०० ते १०.०० पर्यत श्री.बलदेवा यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम होईल
श्री.संत श्रेष्ठ गजानन महाराज मंदिर येथे सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमास उपस्थिती द्यावी. दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी चेअरमन /विश्वस्त जीवन मोती सह. गृहनिर्माण संस्था शिरसोली रोड यांच्या वतीने केले आहे.





