ताज्या बातम्याजळगांव जिल्हा

डॉ.केतकी पाटील निर्मित संविधान@७५ दिनदर्शिकेचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून कौतुक

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २१ जानेवारी २०२५ |

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील निवास्थानी जाऊन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा ताई खडसे यांची भेट घेतली. या प्रसंगी संविधानाला अनुसरून तयार केलेली संविधान@७५ दिनदर्शिका डॉ केतकी पाटील यांनी ना. खडसे यांना भेट दिली. या प्रसंगी दिनदर्शिकेचे अवलोकन करून अभ्यास पूर्ण दिनदर्शिका निर्मितीबाबत डॉ केतकी पाटील यांचे अभिनंदन केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हे वर्ष संविधान पर्व असल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घर घर संविधान असे विधान केले आहे. भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी संविधान दिनदर्शिका तयार केली असून त्याचे वितरण सुरु झाले आहे. आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा ताई खडसे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्याने सकाळी डॉ केतकी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी दिनदर्शिकेत अंतर्भूत बाबींची माहिती देण्यात आली. दिनदर्शिकेची पाहणी करीत सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सरळ भाषेत संविधान मांडले आहे. या बद्दल ना खडसेंनी समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीत देखील दिनदर्शिका घेऊन जाणार असे आश्वासन ना रक्षा ताई खडसे यांनी डॉ केतकी पाटील यांना दिले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button