जळगावअपघात

शिंदे गटाच्या महिला महानगर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती व दीर भीषण अपघातात ठार; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ४ जून २०२५
जळगाव शहराजवळील निमखेडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी मयत बांधवांची नावे आहेत.

निमखेडी येथील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही बंधू गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात दोघं सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button