जळगांव जिल्हा

निर्धार नामदार अनिल दादांचा : स्मिताताईंना मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठविण्याचा

जळगांव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार होणार

अमळनेर दि.२२ : जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार म्हणून दिल्ली ला मोठ्या मताधिक्याने पाठवणार असल्याचा ना.अनिल भाईदास पाटील यांनी निर्धार केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा काल दिनांक २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमळनेरकरांबरोबर विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद घडून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कर्तृत्वाने देशाला जगभरात लौकिक प्राप्त करवून देत आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्यात त्यांना साथ देण्याचा संकल्प यावेळी अमळनेर च्या सूनबाईला केला.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री मा. अनिलदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पाटील, अशोकभाऊ पाटील, व्ही.आर.आप्पा, भिकेश पाटील, भागवत पाटील, मोहनभाऊ सातपुते, योगेश मुंदडा, डॉ. अपर्णाताई मूठे, मुख्तार खाटीक, प्रथमेश पवार, प्रदीप अग्रवाल, लालचंद सैनानी, यशवंत बैसाने, सत्तार तेली, विजय राजपूत, संजय पाटील, डॉ. अशोक पाटील, ऋषभ पारख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button