जळगावमहानगर

आर्ट गॅलरी, म्युझियमसाठी शासन स्तरावर मदत करणार : जिल्हाधिकारी, फोटोग्राफर्स साठी ज्ञानेश्वर बढे यांचे आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२१ ऑगस्ट २०२५ :जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन तर्फे, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. आर्थिक साक्षरतेवर बढे कॅपिटलचे संचालक ज्ञानेश्वर बढे यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान झाले.

फोटोग्राफर पैसे कमवतात, पण योग्य गुंतवणुकीबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. याच उद्देशाने, फोटोग्राफर बांधवांना आर्थिक गुंतवणुकीबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ज्ञानेश्वर बढे, फाउंडेशनचे अध्यक्ष संदीपाल वानखेडे, भैरवी पलांडे-वाघ उपस्थित होते. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन फोटोग्राफर्सना शुभेच्छा दिल्या.

आर्ट गॅलरी, म्युझियमसाठी शासन स्तरावर मदतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगावमध्ये आर्ट गॅलरी आणि सुंदर म्युझियम असावे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच, शासकीय स्तरावर काही मदत लागल्यास ती नक्कीच दिली जाईल असे आश्वासन दिले. जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांनी जिल्ह्याचं सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडावे, आपण काढलेलं सुंदर छायाचित्र मला वैयक्तिक पाठवा मी ते फेसबुक पेजवर प्रकाशित करेल आणि जिल्ह्याच्या प्रगतीला आपण हातभार लावूया, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला वृत्तपत्र आणि व्यावसायिक फोटोग्राफर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे हेमंत पाटील जळगावकर, सचिन पाटील, जुगल पाटील, पांडुरंग महाले, अरुण इंगळे, भूषण हंसकर आणि भूषण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सचिव अभिजीत पाटील यांनी केले तर प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

उपस्थित मान्यवर..
कार्यक्रमाला चंद्रशेखर नेवे, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, अतुल वडनेरे, शैलेश पाटील, जयंत चौधरी, सुरेश सानप, राजू माळी, वैभव धर्माधिकारी, प्रकाश मुळे, नितीन थोरात, रुपेश महाजन, उदय बडगुजर, विजय बारी, संदीप याज्ञिक, शब्बीर सय्यद, अभिषेक मकासरे, राजू जुमनाके, उमेश चौधरी, प्रवीण गायकवाड, निखिल सोनार, बंटी बारी, चित्रनिश पाटील, विनोद बारी, रोशन पवार, किशोर पाटील, वाल्मिक जोशी, नितीन नांदुरकर, सचिन गोसावी, अयाज मोहसिन, सतीश सैदाणे, विक्रम कापडणे, नाजनीन शेख, चेतन वाणी, सुनील भोळे, जकी अहमद, निखिल वाणी, काशिनाथ चव्हाण, योगेश चौधरी, संदीप महाले, विकास पाथरे, दीपक सपकाळे, संदीप होले आणि कल्पेश वाणी यांसह वृत्तपत्र, व्यावसायिक फोटोग्राफर, प्रादेशिक आणि यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button