जळगांव जिल्हासामाजिक

तिळवण तेली समाज सभागृहासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी केला मंजूर

लोकमाध्यम न्युज | जळगाव १ ऑक्टोबर २०२४ |

धरणगाव येथील तिळवण तेली पंच मंडळी, सुभाष दरवाजा तेली मढीच्या जागेवर भव्य-अत्याधुनिक सर्व सुविधांनीयुक्त सभागृह बांधण्यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. संबधीत कामाची प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून तेली समाज मंडळाचे सभागृहाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी तेली समाजाचे पंच मंडळ आणि समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती.

धरणगाव नगरपरिषद हद्दीतील सिटीएस क्रमांक १४२ अ आणि सिटीएस क्रमांक १४२ ब जागेवर ( खालचा मजला व पहिला मजला) तेली समाज पंच मंडळासाठी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम प्रलंबित होते. ते करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत नुकतेच प्रशासकिय मान्यता आदेश प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जा.क्र. नप / नियोजन / नगरोत्थान योजना / १५/२०२४ दिनांक ३०/०९/२०२४ च्या पत्रानुसार नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रशासकिय मंजूरी दिली आहे. या कामासाठी २५ लाख ६० हजार ९९९ रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.

तिळवण तेली समाज मंडळाच्या पंच मंडळींनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ना. पाटील यांना प्रस्तावित बहुउद्देशीय सभागृहाची गरज पटवून दिली होती. संबधीत सभागृह हे दुमजली होणार असून तळमजल्यावर पंचमंडळीचे सभागृह आणि वरच्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, सभागृह अपेक्षित आहे. समाजाची गरज आणि निकड ओळखून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याने समाजात आनंद, उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. पंचमंडळीने यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button