जळगांव जिल्हावैद्यकिय

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा, तर कोषाध्यक्षपदी दिनेश मालू; पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सलग आठव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (दि. २६ जुलै) केमिस्ट भवन येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड एकमताने करण्यात आली. याचवेळी संदीप बेदमुथा यांची उपाध्यक्षपदी, तर दिनेश मालू यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा असणार आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा (पारोळा) आणि अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

सुनील भंगाळे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून संघटनेत विविध पदांवर कार्यरत असून, जिल्हा केमिस्ट संघटनेच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे. केमिस्ट बांधवांच्या हितासाठी सातत्याने काम करताना त्यांनी संघटनात्मक बळकटीसह विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनेचे कार्य जिल्ह्याबरोबरच राज्यभर पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

संघटनेचे सचिव अनिल झंवर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि केमिस्ट सभासदांच्या विश्वासाच्या बळावर सुनील भंगाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबविले. केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच उपलब्ध राहिल्याने त्यांना जिल्ह्यात विशेष मान्यता मिळाली आहे.

संघटनात्मक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुनील भंगाळे यांचा जिल्हा तसेच राज्य पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या आठव्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button