जळगावविधानसभा निवडणूक
शिवसेना उपनेते संजय सावंत जळगाव शहराचे प्रचारप्रमुख
लोकमाध्यम न्युज | जळगांव २ नोव्हेंबर २०२४ |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून शिवसेना उमनेते व संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. ते सलग पंधरा दिवस शहरात मुक्काम करणार असून प्रचाराचे नियोजन आदी बाबी हाताळणार आहेत.
आम्ही जळगाव शहराची जागा हमखास जिंकणार आहोत. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शहरात एकजीनसीपणाने काम करीत आहे. या निवडणुकीत परिवर्तनाची संधी जनतेला उपलब्ध झाली आहे, असे श्री सावंत यावेळी म्हणाले. या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.