जळगावशैक्षणिक

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी कु. धनश्री ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

यंदाही १०० टक्के निकाल:विशेष प्राविण्यासह सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

जळगाव दि.३० मे २०२४ : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा यंदाही १०० टक्के निकाल लागला. यात कु. धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), चि. मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय (९५.००%) व कु. अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय (९३.८० %), चि. आयूष दीपक जैन – चतुर्थ (९३.४०), कु. पायल सचिन सोनवणे – पाचवा (९२.००) उत्तीर्ण झालेत.

गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतुक केले. सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. २७ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्यावर, १८ विद्यार्थी ८० टक्केच्यावर तर तीन विद्यार्थ्यांनी ७५ च्यावर गुणप्राप्त केले.

अभ्यासाप्रती निष्ठा, सातत्याने केलेला अभ्यास यातून शंभर टक्के यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. परिस्थीती कशीही असो मात्र दूरदृष्टी महत्त्वाची आहे आणि हि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीचे यश
शाळेत प्रथम आलेली कु. धनश्री हिचे वडील जैन फार्मफ्रेश फूड्स लिच्या ओनियन विभागात काम करतात तसेच शिवणकामासाठी हातभार लावतात तर आई पुर्णवेळ शिवणकाम करून घराचा उदर निर्वाहासाठी मदत करतात. “भवरलालजी जैन यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या स्कूलमध्ये मुलगी संस्कारीत होत असून कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली.

एकल पालक असलेल्या मुकूंदचे यश
स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुकूंद चौधरी याची आई एकलपालक असून जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चरमध्ये काम करुन त्या आपल्या आई-वडीलांसह मुलांची जबाबदारी सांभाळतात.

कटलरी साहित्य विक्री करणाऱ्या पित्याची मुलगी अश्विनी
रेल्वेमध्ये खेळणे विकणे व दारोदार कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी अश्विनीचा तृतीय क्रमांक आला आहे.

प्रतिकूल परिस्थितीत आयुष आणि पायलचे यश
आयुष जैन ह्याचे वडील दाणाबाजारात अगरबत्ती विक्री करतात तर आई शिवणकाम करते. पायल सोनवणेच्या वडीलांचा हरिविठ्ठलनगरमध्ये पानटपरीचा व्यवसाय आहे.
एकूणच सर्व विद्यार्थी हे प्रतिकूल परिस्थिती असताना, आई-वडील मेहनत करुन उदरनिर्वाह करुन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पाठबळ दिल्याने ते घवघवीत यश संपादन करु शकले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button