जळगावविधानसभा निवडणूक

लाडक्या बहिणींनी डॉ.अश्विन सोनवणेंना ओवाळले, ज्येष्ठ नागरिकांनी दिले विजयाचे आशीर्वाद

लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील महर्षि वाल्मीक मंदिर,पक्की चाळ, महर्षि वाल्मीक नगर, तानाजी मालसुरे नगर, मेस्को माता नगर, दिनकर नगर, मोहन टॉकी, कांचन नगर, घुले प्लॉट परिसर दालफड, शनीपेठ, रिधुरवाडा या परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला.

या परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या धार्मिक मंदिरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दर्शन घेत आपल्या विजयाची प्रार्थना देखील केली. या प्रसंगी डॉ.अश्विन सोनवणे यांना लाडक्या बहिणींनी ओवाळत ज्येष्ठ नागरिकांनी विजयासाठी आशीर्वाद देखील दिले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे,शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे(मोगली बाबा), मंगला सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी,जित सोनवने, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button