जळगावसामाजिकसांस्कृतिक

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे उत्कृष्ठ शिवजयंती उत्सव मिरवणुकीला पुरस्कार

प्रतिभा शिंदे यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १६ फेब्रुवारी २०२५ |

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती जळगांव यांच्या वतीने जळगांव शहरात शिवजयंती च्या निमिताने पूर्वतवारी करण्यासाठी विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली हाउसिंग सोसायटी हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात होते.
मागील २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जळगाव शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्‌या दिमाखात साजरा केला जात आहे. ज्यात सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास या बाबत बौद‌धिक प्रवोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आपण आयोजन करीत असती या वर्षीही शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्या बाबतीत निर्णय घेण्यात आले.
यात सर्वप्रथम या वर्षीच्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणुन प्रतिभा शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या वर्षी शिवजयंती निमित्ताने पुढील उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.

दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने महिलांची मशाल मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक शिवाजी स्टेडियम येथून सुरू होईल महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शिवस्मारकावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल. IMPL च्या वतीने शिवकालीन वस्तुप्रदर्शन केले जाईल.

दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शोभायात्रा काढून शिवस्मारकावर छ. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. •या वर्षीं प्रथमच जळगांव शहरातील विविध शिवजयंती साजऱ्या करणाऱ्या मंडळाना सर्वांनी सायंकाळी आपल्या मिरवणुका आपापल्या परिसरातून सुरवात करून खान्देश मॉल येथे पोहचून मग शिवस्मारकावर समारोप करावा असे आवाहन करण्यात आले असून, या मार्गावरील उत्कृष्ठ मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना अनुक्रमे 20000, 15000₹ 10000₹ अशे प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार असून उत्कृष्ठ सजावट, उत्कृष्ठ जिवंत देखावा, उत्कृष्ठ लेझिम पथक, आदर्श व शिस्तबद्ध आयोजन, सामाजिक संदेश अशी पाच प्रत्येकी 5000₹ ची बक्षिसेही देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

शिवजयंती सर्व धर्मीय व सर्व जातीय बांधवांनी एकत्रित येऊन शांततेत व एकजुटीने साजरी करावी असे आवाहन ही या वेळी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीत छावा सिनेमा टॅक्स फ्री करणे, राहुल सोलापुरकरला अटक करणे असा ठराव करण्यात आला.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे स्वागताध्याक्ष अ.करीम सालार, कार्याध्यक्ष कैलास  सोनवणे, सचिव  राम पवार, कोशाध्यक्ष सचिन धांडे. उपाध्यक्ष रोहित निकम, लीना पवार, जयश्री महाजन, मुकुंद सपकाळे, निलेश पाटील, विष्णू भंगाळे समिती सदस्य पुरुषोतम चौधरी, अजबसिंग पाटील, दीपक सूर्यवंशी, संतोष पाटील, प्रफुल्ल पाटील, खुशाल आप्पा चव्हाण, योगेश नन्नवरे, अविनाश बाविस्कर, गनी मेमन,फईम पटेल, साजिद शेख, सत्यजित साळवे.
समितीचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. डी डी पाटील बच्छाव , श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, जगन्नाथ पाटील, समितीचे समन्वयक सुरेश एल पाटील, सुरेंद्र पाटील, कुलभूषण पाटील. किरण बच्छाव, शंभू पाटील. आदी मान्यवर उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button