७८ वा होमगार्ड वर्धापन दिन समारोप समारंभ संपन्न
लोकमाध्यम न्युज | जळगांव १४ डिसेंबर २०२४
जळगांव जिल्हयात होमगार्ड संघटने तर्फे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह दि. ०७/१२/२०२४ ते १३/१२/२०२४ या कालावधीत विवध कार्यक्रमांच्या माध्यमातुन जिल्हयात ऊत्साहाने साजरा करण्यांत आला.
सदर कालावधीत सर्व तालुका पथकांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्रथमोपचार विमोचन, पथनाटय ईत्यादि विषयाबाबत शाळा, सार्वजनिक ठिकाणी प्रात्यक्षीक देण्यांत आले तसेच पथनाटयाच्या माध्यमातुन वाहतुक नियमांचे पालन, तंटामुक्ती, सामाजीक एकता ईत्यादीबाबत शहरातील मुख्य चौकात जनजागृती करण्यांत आली. वरील प्रकारच्या सर्व उपक्रमांमध्ये होमगार्डसने स्वेच्छेने सहभाग नोंदवीला.
दि. १४/१२/२०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जळगांव येथे पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदानावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मा. सुरेश दामु भोळे, (राजु मामा) आमदार जळगांव विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड, तथा अपर पोलीस अधिक्षक जळगांव यांचे अध्यक्षतेखाली सदर ७८ वा होमगार्ड वर्धापन दिनाच्या सांगता समारोप समारंभाचे आयोजन करण्यांत आले होते.
सदर प्रसंगी मा. आ. राजु मामा भोळे यांचे हस्ते ध्वजा रोहण करण्यांत आले. व त्यांना परेड संचलन करुन मानवंदना देण्यांत आली, प्रमुख अतिथींचे स्वागत अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी शाल, श्रीफळ, प्रतिक चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले तसेच अशोक नखाते यांचे स्वागत . संजय पाटील, समादेशक अधिकारी होमगार्ड जळगांव यांनी शाल, श्रीफळ, प्रतिक चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले, तसेच प्रशिक्षणार्थी डिवाय.एस.पी. केदार पी.बारबोले यांचे स्वागत संदिप हमीद तडवी, केंद्र नायक होमगार्ड यांनी केले. परेड संचलनाचे नेतृत्व सुनिल पाटील, कंपनी कमांडर होमगार्ड जळगांव यांनी व सहायक म्हणून रविंद्र ठाकुर, वरिष्ठ पलटन नायक, होमगार्ड यांनी केले परेड संचलनामध्ये होमगार्डच्या ४ प्लाटुन ने सहभाग घेतला कार्यक्रमाध्ये मागील वर्षभरात ऊत्कृष्ट कामगीरी केलेल्या अधिकारी/होमगार्ड यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यांत आला. तसेच ७८ वा होमगार्ड वर्धापन दिना निमीत्त .मा.राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, महानिदेशक होमगार्ड दिल्ली, गृहसचिव दिल्ली ईत्यादीचे शुभेच्छा संदेश प्राप्त झालेले होते. त्याचे वाचन नरविरसिंग पी. रावळ, समादेशक अधिकारी होमगार्ड भुसावळ यांनी केले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अशोक नखाते, यांनी होमगार्ड कार्याचा गौरव करुन सर्व होमगार्डसना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय भाषण आ.राजु मामा भोळे यांनी केले. त्यात त्यांनी होमगार्डच्या प्रलंबीत प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हयातील सर्व तालुका समादेशक/प्रभारी अधिकारी व पथकातील सर्व अधिकारी तसेच ५०० होमगार्ड उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओमप्रकाश शर्मा, माजी होमगार्ड अधिकारी यांनी केले. सप्ताह यशस्वितेसाठी संदिप ह. तडवी, केंद्र नायक होमगार्ड, मदन र. रावते. सा.प्र.सुभेदार, समादेशक अधिकारी. संजय पाटील, कंपनी नायक सुनिल पाटील, व.प.ना. रविंद्र ठाकुर, कं.ना. कडु सपकाळे तसेच जळगांव पथकातील सर्व अधिकारी व होमगार्ड यांनी अथक परीश्रम घेतले.