जळगावमहानगर

सुनील महाजन यांना छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २७ जानेवारी २०२५ |

 प्रतिनिधी :- ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल गुन्ह्यानंतर ते फरार होते. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी काढली जात होती. या पाईप चोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवली होती. या प्रकरणात सूत्रधार सुनील महाजन हे असल्याचे समोर आले होते. यानंतर आणखी २ वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्यात सर्व प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आरोप असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे अजूनही फरार आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. सुनील महाजन मिळून येत नसल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरू केली होती. तर महाजन यांनी मुंबई उच्चन्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडपीठाच्या न्या.पेडणेकर यांच्या न्यायालयाने सुनील सुपडू महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील कामकाज दि.४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अँड.सागर चित्रे आणि अँड.राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button