जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-2025’ उत्साहात

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १३ डिसेंबर २०२५ : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन स्कूल चा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात संपन्न झाला. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल निकेतन आणि विद्या निकेतनच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडविले. यावेळी उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले. 

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, फरहाद गिमी, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन, अनुभूती बालनिकेतन आणि विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. उपस्थितीतांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. ‘तेरा मंगल मेरा मंगल…’ या गीतावर अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन म्हणजेच दादाजी यांची भूमिका करणाऱ्या निवेदकाचे आगमन झाले. हा क्षण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला. कीर्ती पगारिया, स्मिता काटकर यांनी भवरलालजी जैन यांचे जीवनदर्शन आपल्या प्रास्ताविकातून मांडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘भारत प्यारा’ हे समूहगीत प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तसेच संस्कृत वर्णमाला गीत, कृष्ण, राम कथा सादरीकरण आणि ‘रामराज्य’ नाटिका यामुळे पौराणिक कथांचा उलगडा नाटिकांतून चिमुकल्यांनी सादर केला. जीवनातील अध्यात्म, साधेपणा, भक्तीभाव आणि मानवी मूल्यांचे विद्यार्थ्यांनी अभिनयातून दर्शन घडवले.

महाराष्ट्रातील सणांवर आधारित नृत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक उपस्थितांसमोर चिमुकल्यांनी उभी केली. कलेसह आरोग्याची जाण जपणारे सादरीकरण सुद्धा झाले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली. योगा, झुम्बा आणि ॲरोबिक्सच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीराचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. यावेळी अंबिका जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माळी रोपांची निगा राखतो, त्याप्रमाणे शाळेतील शिक्षक मुलांची निगा राखून त्यांना सुज्ञ नागरिक बनवतात. मुलांनी देखील नेहमी हसत खेळत राहावे, जिज्ञासू रहावे, प्रश्न विचारावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मनोज परमार यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button