जळगावशासकीय

जिल्हास्तरीय ‘वारकरी भवनाचे’ ४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा - ना.गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन व ना.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव दि.१ : प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून इतर जिल्ह्यांसाठी हा प्रकल्प मार्गदर्शक राहणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय “ वारकरी भवन ” बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती.त्यानुसार खेडी शिवारात ६ कोटी ०६ लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
वारकरी भवनाचे भूमिपुजन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्तावित आहे. त्या नियोजनासाठी शनिवार दि. २ मार्च रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात बैठक संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमवार दि.४ मार्च २०२४ रोजी सायं. ६:०० वाजता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते वारकरी भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार आहे .या भूमिपूजन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून सदर कार्यक्रम पूर्णत: वारकरी पद्धतीने पण शासकीय राजशिष्टाचार सांभाळून पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्री व आमदार- खासदार यांच्या सहकार्य व सहमतीने जिल्हा नियोजन समिती निधीमधून मंजूर झालेले हे वारकरी भवन महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण ठरणार असून त्यासाठी प्रशासकीय योगदान देण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्य समजतो आणि वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह खासदार आमदार व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजन बैठकीस ह.भ.प. परमेश्वरजी महाराज गोंडखेल, ह.भ.प. गोविंद महाराज केकत निंभोरा, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. महंत संजीवदास महाराज सावखेडा, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुधाकर महाराज मेहूण, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. अंकुश महाराज मनवेल, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडे , ह.भ.प. सुशील महाराज विटनेर, ह.भ.प. शाम महाराज पिंपळगाव, ह.भ.प. यशवंत महाराज कमळगाव, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ.प. विजय महाराजभामरे, ह.भ.प. रुपचंद बाबा दहिवदखुर्द, ह.भ.प. सदाशिव महाराज साकरीकर, ह.भ.प. दिनकर महाराज कडगावकर, यांचेसह संपूर्ण जिल्ह्यातून दिंडीचालक, वारकरी संस्थाचालक, मठाधिपती यांचेसह महिला व पुरुष कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले . सदर बैठकीचे संचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले . गजानन महाराज यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. परमेश्वर महाराज.,आवारकर महाराज व समाधान महाराज भोजेकर यांची समयोचित भाषणे झाली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button