जळगावअपघात

विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला डंपर ने दिली धडक; तरुण ठार तर तीन जण गंभीर;

शालेय विद्यार्थी बालंबाल बचावले! जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील घटना

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २५ जानेवारी २०२५ |

प्रतिनिधी:- शहरात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून आज सकाळी शहरातील दूध फेडरेशन जवळ विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला डंपर ने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

असून या अपघात प्रकरणी शहर पोलिसांनी डंपर ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. अंकुश आत्माराम भिल वय 27 असे मयत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील दूध फेडरेशन परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपा जवळ विटा घेऊन जाणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19 ए एन 29 झिरो सहा ओव्हरटेक करण्याच्या नादात असणाऱ्या डंपरने कट मारल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या ट्रॅक्टरवर मजूर असलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली आल्यामुळे तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असणारे इतर सुनील मधुकर भिल वय 22 , गणेश भगीरथ भिल वय 18 आणि शुभम सुखाभिल वय 20 तिघे राहणार इदगाव हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती कळतच घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन डंपर ताब्यात घेतला. मयत अंकुश यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या घटनेबाबत उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button