माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा डॉ.अश्विन सोनवणेंनी घेतला आशीर्वाद
लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव जिल्ह्यात राजकीय प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून यंदा अनेक दिग्गजांना धक्का देण्यासाठी अपक्ष उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरले आहे. तर जळगाव शहर विधानसभा मतदार संघात देखील अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी देखील दि.६ पासून नारळ फोडून प्रचाराचा सुरुवात केली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी दिग्गज उमेदवार मैदानात असून जळगाव शहराच्या विकासाठी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आजपासून प्रचार सुरु केला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहे.
याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे, विशाल सोनवणे, जित सोनवने, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे , आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, , बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.