जळगांव जिल्हाअपघात
रेल्वे दुर्घटनास्थळी पोहचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ जानेवारी २०२५ |
( जिमाका ):-जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहचून परिस्थिती हाताळली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते.
मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून. जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटल मध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.





