जळगांव जिल्हामहाराष्ट्रसहकार

रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’

 

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक आणि युवा सहकार नेते रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाचा मानाचा “युवा सहकार पुरस्कार” प्रदान करण्यात आला.हा सर्वोच्च सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रोहित निकम यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष रोहित निकम यांनी विविध कार्यकारी सोसायटीपासून ते सहकार क्षेत्रातील राज्याच्या शिखर संस्थेपर्यंत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. जळगाव जिल्हा दूध संघ संचालक आणि जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन , जिल्हा बँक यांसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांवर म्हणून कार्यरत राहत त्यांनी सहकार चळवळीला मोठी गती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकार से समृद्धी’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सदैव कटिबद्ध राहिले आहेत. रोहित निकम यांचे सहकारिता क्षेत्रातील हे मोलाचे योगदान, त्यांचे नेतृत्व, समर्पण आणि त्यांच्या उत्स्फूर्त कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला होता.याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य मंत्री पंकज भोयर , पणन मंत्री जयकुमार रावल , भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा आमदार चित्रा वाघ , विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, तसेच राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुन बोरुडे, सचिव रामदास मोरे व विविध राज्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या संस्था आणि पाठीशी उभे राहणाऱ्या युवा नेतृत्वाचा सन्मान केल्याने या क्षेत्राला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.  यांसह अनेक प्रमुख मंत्री व आमदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात राज्यातील सहकार चळवळीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला व सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला सरकार पूर्ण ताकदीने पाठबळ देईल, अशी ग्वाही दिली.

या सोहळ्याला सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते, विविध जिल्हा बँकांचे संचालक, पतसंस्था फेडरेशनचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यानी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button