माध्यम क्षेत्रातील सल्लागार अनंत भोळे ‘लेवा ऑयकॉन’ पुरस्काराने सन्मानीत

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ४ फेब्रुवारी २०२५ |
ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनतर्फे जळगाव येथील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले दिग्गज व्यक्तिमत्व मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खंडू भोळे यांचा ‘लेवा आयकॉन’ पुस्कार देऊन सन्मान करण्यात आला.लेवा पाटीदार समाजातील आपापल्या क्षेत्रात नावारुपास आलेल्या मान्यवरांना यावेळी पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ. राजुमामा भोळे, शिरीष दादा चौधरी, जनरल जगदीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अनंत खंडू भोळे हे माध्यम क्षेत्रातील चिरपरिचीत नाव. अनेक प्रतिष्ठानांच्या व्यावसायिक जाहिराती तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात मुद्द्यांवर आधारीत निवडणुक कॅम्पेन सुरु करण्याचा मान त्यांचेकडे जातो. आज एक यशस्वी राजकीय रणनितीकार म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक मोठ्या नेत्यांना त्यांनी आपली सेवा दिली आहे, त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन (२०१९ निवडणूक), आ.राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिरीष चौधरी, ॲड. रोहिणीताई खडसे, स्व. खा. हरीभाऊ जावळे, स्व. वाय. जी. महाजन यांचा समावेश आहे.
आपल्या क्षेत्रात असाधारण कामगिरी केल्याबद्दल त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सन्मानीत करण्यात आले.





