जळगावमहाराष्ट्रराजकिय

भाजपा सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात जळगाव जिल्हा महानगर चा पाचवा क्रमांक

जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ७ फेब्रुवारी २०२५ |

भाजप महाराष्ट्र संघटन पर्व सक्रिय सदस्य नोंदणी कार्यशाळा मुंबई येथे संपन्न झाली असून, या कार्यशाळेत सदस्य नोंदणी अभियानात महाराष्ट्रातील आघाडीवर असणाऱ्या (टॉप फाईव्ह) जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.यात महाराष्ट्रातील एकमेव व जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांचा सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मा.ना.चंद्रकांत दादा पाटील, ना.पंकजा मुंडे ना.प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

गत जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी महाअभियान राबविण्यात आले आहे. यात जळगाव जिल्ह्यात ना. गिरीश महाजन केंद्रीयमंत्री ना. रक्षा खडसे खा. स्मिता वाघ, ना. संजय सावकारे आ. सुरेश भोळे राजु मामा, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे व जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात व महानगरात अभियान राबविण्यात आले असून यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान मिळाला. जळगाव शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व अभिनंदन केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button