जळगांव जिल्हाराजकिय

भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : मुंबईतील नंदवन येथे आज भुसावळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास ठेवत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी मोठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते मा. गुलाबरावजी पाटील साहेब, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील आणि पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सौ.सरिता माळी कोल्हे, जळगांव जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे अनिलभाऊ चौधरी आणि भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या नेतृत्वाला नवी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे.

भुसावळच्या राजकारणात या प्रवेशामुळे पुढील काळात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button