जळगांव जिल्हामहाराष्ट्रराजकिय

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान विभागीय कार्यशाळा संपन्न

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १५ फेब्रुवारी २०२५ |

 भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महारातील जळगांव – धुळे – नंदुरबार जिल्ह्याची विभागीय कार्यशाळा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी राजे सभागृहात संपन्न झाली.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचेकडून भाजपा सदस्यता अभियान बाबत आढावा घेण्यात येऊन, उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील टॉप पाच विधानसभांपैकी जळगाव विधानसभेने पाचवा क्रमांक मिळवील्याबद्दल जळगाव विधानसभा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे यांचे सन्मान करण्यात आला. सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदिं च्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी राज्यात 1 कोटी नागरिकांनी भाजपा पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आगामी काळात दीड कोटी सदस्यसंख्या असलेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष्य पार करण्यासाठी मेहनत घेण्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्यकारी अध्यक्ष
रविंद्र चव्हाण यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आले.
ना.मंत्री, गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, मंत्री, जयकुमार रावल,माजी मंत्री,विजयकुमार गावित,प्रदेश महामंत्री, विजय चौधरी,उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री, रवी अनासपुरे, प्रदेश महामंत्री आमदार, विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री, राजेश पांडे, आमदार, राजुमामा भोळे , मंगेश चव्हाण, राजेश पाडवी, अमोल जावळे, अनुप अग्रवाल , राघवेंद्र भदाणे, माजी खासदार सुभाष भामरे, डॉ.उल्हास पाटील, एम के. अण्णा पाटील, चंदूलाल पटेल, डॉ.राधेश्याम चौधरी, उज्वला बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंबपडकर, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, डॉ. राजेंद्र फडके, किशोर काळकर, नंदू महाजन, अजय भोळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अरविंद देशमुख, महेश जोशी, अमित भाटिया, सचिन पान पाटील, जितेंद्र मराठे, महेश पाटील, मुविकोराज कोल्हे, योगेश पाटील, मनोज बाविस्कर, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button