जळगांव जिल्हाक्राईम

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीसह तरुणींची टवाळ खोरांकडून छेड

मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २ मार्च २०२५ |

( प्रतिनिधी ) केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला असून या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे . टवाळखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची यावेळी मागणी केली. मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात मंत्री रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या असून, त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

संत मुक्ताई यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले. “मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि कोथळी येथे दरवर्षाप्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण काही मुलींसोबत सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले .

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button