जळगाववैद्यकियसांस्कृतिक

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ७ मार्च २०२५ |

(प्रतिनिधी) : शहरातील बालकांच्या सर्वांगिण कलाविकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज (दि.७) डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संचलित महादेव हॉस्पिटल, जुने गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमाचे बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजन करण्यात आले होते.

आज सकाळी १० वाजता गोदावरी फाऊंडेशन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.रिषभ पाटील व समन्वयक रत्नकिशोर जैन, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्या हस्ते नटराज पूजन करुन शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.

या शिबिरात शहरातील ४५ कलावंतांनी सहभाग घेतला होता. या कलावंतांची इसीजी, रक्तातील शुगर, ब्लडप्रेशर व टूडी इको हृदयतपासणी करण्यात आली. यापैकी २ कलावंतांना पुढील अधिक तपासण्या व उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बालरंगभूमी परिषदेतर्फे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाबद्दल नृत्य, नाट्य, संगीत तसेच लोककला कलावंतांतर्फे परिषदेचे आभार मानण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची कार्यकारिणी, पदाधिकारी सदस्य सुदर्शन पाटील, मोहित पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, पंकज बारी व गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button