जळगांव जिल्हाक्रीडाक्रीडांगण

उद्यापासून तीन दिवस चालणार पत्रकार प्रीमियर लीगचा थरार

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ९ फेब्रुवारी २०२५ |

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी जळगाव जिल्ह्यात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि.१० पासून तीन दिवसीय क्रिकेट लीगला सुरुवात होत असून दिवसभरात ९ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे लॉट्स पाडण्यात आले असून त्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ उद्यापासून शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सुरू होणार आहे. स्पर्धेत जिल्हाभरातील पत्रकारांचे २० संघ सहभागी होणार असून सर्व सामने नॉक आउट पद्धतीने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील आणि जळगाव शहरातील सर्व माध्यमातील खेळाडू खेळीमेळीच्या वातावरणात आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवणार आहेत. दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेत पहिल्या दिवशी ९ सामने पार पडणार आहेत.

सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन
स्पर्धेसाठी सामन्याचे लॉट्स जाहीर करण्यात आले असून सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या, अपूर्ण संघ आणि पत्रकार व्यतिरिक्त असलेल्या संघांना बाद ठरवण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. आयोजक समितीमध्ये वाल्मिक जोशी, चेतन वाणी, वसीम खान, किशोर पाटील, जकी अहमद, सचिन गोसावी यांचा समावेश आहे.

असे आहे सामन्याचे वेळापत्रक
पहिला दिवस दि.१० फेब्रुवारी २०२५

सकाळी ८.०० वाजता…
१) प्रिंट मीडिया (टीम १) vs डिजिटल मीडिया

सकाळी ९.३०
२) यु ट्यूब मीडिया vs प्रेस फोटो ग्राफर

सकाळी ११ वाजता
३) चाळीसगाव vs रावेर

सकाळी १२.३०
४) मुक्ताईनगर विरुद्ध भडगाव

दुपारी २.०० वाजता
५) यावल विरुद्ध पाचोरा

दुपारी ३.३० मिनिटे ..
६) धरणगाव विरुद्ध भुसावळ

सायंकाळी ५ वाजता
७) अमळनेर विरुद्ध चोपडा

सायंकाळी ६.३० वाजता
८) संपादक विरुद्ध जामनेर..

——————–

दुसरा दिवस दि.११ फेब्रुवारी २०२५

सकाळी ८ वाजता..
इलेकट्रॉनिक्स मीडिया विरुद्ध प्रिंट मीडिया २

क्वाटर फायनल
१) सकाळी ११ वाजता
एम१ विरुद्ध एम३

२) सकाळी १२.३०
एम २ विरुद्ध एम ४

३) दुपारी २ वाजता
एम ५ विरुद्ध एम ८

४) दुपारी ३.३०
एम ६ विरुद्ध एम ९

५) सायंकाळी ५ वाजता
एम ७ विरुद्ध एम १०

——————-

दिवस तिसरा दि.१२ फेब्रुवारी २०२५

दोन सेमी फायनल
आणि एक फायनल

समारोप सोहळा आणि बक्षीस वितरण सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button