जळगावसामाजिक

सैन्यदलात भरती झालेल्या युवकाचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

लोकमाध्यम न्युज जळगाव दि. ७ जून २०२५ : मेहरुण परिसरातील महाजन नगर मधील विसपुते चारुदत्त संतोष वय 21 भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून भरती झाला आणि त्याचे स्वप्न साकार झाले. त्याचे परिसरातील माजी नगरसेवक प्रशांत नाईक आणि रहिवाश्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.

याप्रसंगी सोबत बंडु वाणी , ज्ञानेश्वर आंधळे, किशोर नेमाडे, भिकन पाटील, विनोद शेवाळे, मुकेश नाईक, संजय देवरे, भारत पाटिल , शरद पाटील ,निलेश कासार,कल्पेश सोनार ,राजेश बनछोडे, विजय कासार ,तुषार नेमाडे, गोलु पांडे,मोंटि राजपुत, अनिकेत चौधरीगौरव सोनार ,सर्व धारकरी,परिसरातील सर्व माता भगिनी उपस्थित होते. चारुदत्त वीिसपुते वकरच देशसेवेसाठी रुजू होणार आहे.

जळगाव येथे नुतन महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या चारुदत्त ने 2024 मध्ये मैदानी परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला व त्याची 2024 ला अग्निवीर पदासाठी नियुक्ती झाली.मध्य प्रदेश येथे 05 जुन रोजी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कारगील येथे आपल्या देशासाठी सशस्त्र सेवा बजावणार आहे. सीमेवर सेवेसाठी जाण्याअगोदर आपल्या गावी आलेल्या चारुदत्त या अग्निवीर सैनिकाचे ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, ध्वनीक्षेपकावरून देशभक्तीपर गाणी वाजवत, गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button