महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे आ.राजु मामा उमेदवारी अर्ज दाखल करणार
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर भरणार उमेदवारी अर्ज
लोकमाध्यम न्युज | जळगांव २७ ऑक्टोबर २०२४ |
गेल्या 10 वर्षापासून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय झालेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना पुन्हा भाजपा ने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मामांना हॅट्ट्रिक करण्याची संधी दिलेली आहे. उद्या वसुबारस च्या शुभमुहूर्तावरती दिनांक २८ ऑक्टोबर सोमवार सकाळी १०:३० वाजता आमदार राजूमामा भोळे आपला उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या प्रसंगी ना. गिरीश भाऊ महाजन केंद्रीय क्रीडामंत्री ना. रक्षाताई खडसे, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल भाईदास पाटील, खा. स्मिताताई वाघ RPI चे अनिल अडकमोल, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे सर्व पदधिकारी नगरसेवक, महिला युवक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित रहाणार असून अर्ज दाखल करण्याचा मार्ग शिवतीर्थ चौक, व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन) नेहरू चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ वसंत स्मृती,भाजप कार्यालय जुने येथे समारोप होईल व तहसील कार्यालयात आ सुरेश भोळे (राजु मामा )हे उमेदवारी अर्ज दाखल करतील