जळगावकृषीमहाराष्ट्र

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश

लोकमाध्यम न्युज जळगांव दि. २१ (प्रतिनिधी) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. २१ रोजी सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (JISL) या आघाडीच्या कृषी कंपनीकडून आंबा उत्पादनक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. आंब्याच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खतसिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण / जनुकप्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळांमध्येच पिकवलेले आहेत.

जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे, त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच, संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत.
विदेशी वाणांमध्ये ऑस्ट्रेलियाचे किंगस्टन प्राईड, पामेर, ऑस्टिन, फिलिपाईन्सचा कॉरोबो, अमेरिकेचे केंट व टॉमी अटकिन्स, थायलंडचा किंगफॉन, आणि इस्राईलचा माया यांचा समावेश आहे. विविध नावाजलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या रत्ना, मल्लिका, सोनपरी यांसारखे दर्जेदार वाण देखील प्रदर्शनात आकर्षण ठरू शकतील.
या प्रदर्शनात केवळ विविध आंबा वाण पाहण्यासाठीच नव्हे तर आंबा क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे सविस्तर माहिती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. जैन इरिगेशनच्या या उपक्रमामुळे शेतकरी, बागायतदार, संशोधक तसेच आंबा रसिक यांना आंबा उत्पादनाच्या नव्या वाटा व शक्यता समजून घेता येणार आहेत. ‘मँगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिरसोली रोडवर असलेल्या गौराई ग्रामोद्योग मॉलतर्फे केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button