जळगांव जिल्हाताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यात ; विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

लोकमाध्यम न्युज जळगाव दि.२० जून २०२५ : 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा आज शुक्रवार, दिनांक 20 जून 2025 रोजी असून या दौऱ्यात ते धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन तसेच जामनेर तालुक्यातील गोद्री येथील हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळाच्या ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दौरा पुढीलप्रमाणे असेल:

सकाळी 9.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. 9.55 वाजता ते मोटारीने धरणगावकडे रवाना होतील. 10.40 वाजता उपजिल्हा रुग्णालय, चोपडा रोड, धरणगाव येथे भूमिपूजन समारंभ होईल.

यानंतर 10.50 वाजता ते मोटारीने क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिराकडे प्रयाण करतील. 10.55 वाजता धरणगाव येथील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिरात अभिवादन करून 11.00 वाजता स्मारकाचे उद्घाटन आणि पाहणी.

11.10 वाजता मोटारीने डॉ. हेडगेवार नगर येथील मुख्य कार्यक्रमस्थळी प्रयाण होईल. सकाळी 11.15 वाजता डॉ. हेडगेवार नगर येथील कला विज्ञान महाविद्यालय मैदानात आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. या कार्यक्रमात हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळ, गोद्री (ता. जामनेर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन होईल.

दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 1.15 वाजता विमानतळावर आगमन होऊन दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button