अपघातजळगांव जिल्हाताज्या बातम्या

नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू; चाक निखळल्याने क्रुझर ट्रकवर धडकली

सहा जण गंभीर; वराड फाट्याजवळ भीषण अपघात

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – गुजरातहून नववधूला सासरी घेऊन जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ सकाळी क्रुझर वाहनाचा भीषण अपघात होऊन नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चाक निखळल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड गुजरातमधील वापी येथून अकोल्याकडे जात होते. वराड परिसरात पोहोचताच चालत्या क्रुझरचे ( एमएच 30 एलोड 4710 ) पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळले. धडक इतकी भीषण होती की क्रुझर रस्त्यावर पलटी झाली.मृत व जखमींची माहिती

या अपघातात पूजा रवी वाघळकर (वय २५), दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंदूभान वाघळकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात प्रेम भारत वाघडकर (२४), नितेश सुरेश कटोले (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोळकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले असून अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींवर तातडीने उपचार

जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद धरणगाव पोलीस ठाण्यात घेण्याचे काम सुरू आहे.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. सर्वत्र आक्रोशाचे वातावरण पाहायला मिळाले. उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान पठाण, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. “लग्नाचा आनंद काही क्षणातच दु:खात बदलला. या भीषण अपघाताने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.”

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button