जयसिंग वाघ यांना खान्देशीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान
जळगाव दि.३१ मे २०२४ : येथील प्रसिध्द आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केलेल्या साहित्य,प्रबोधन ,सामाजिक तथा विविध कार्याची दाखल आस बहूउद्येशिय विकास संस्था ,प्रितम पब्लिकेशन’ आणि सप्तरंग मराठी चॅनल या सस्थां तर्फे घेण्यात येवून दिनांक २६ मे रोजी त्यांना खान्देशीयन ऑफ दि इयर अवार्ड २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथील हॉटेल कमल पॅराडाईज येथे घेण्यात आलेल्या समारंभात प्रसिध्द सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , बुके देवून वाघ यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी आमदार राजुमामा भोळे, ॲड. संजय राणे ,डॉ.अतुल भारंबे ,मोतीभाऊ मुणोत , आस संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील , प्रितम पब्लिकेशन चे एम. डी. कैलास सोमवंशी , सप्तरंग मराठी चॅनल चे संचालक तथा आयोजक पंकज आर. कासार मंचावर हजर होते .
या प्रसंगी प्रसिध्द सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी हा सोहळा अतिशय मेहनत घेवुन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या अत्यंत जिद्दी व संघर्षरत लोकांचा सन्मान करून नवीन पिढी समोर नवीन आदर्श निर्माण करणारा आहे असे सांगितले .जेजुरीला जाऊ या गाण्यावर किशोरी शहाणे यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बोरसे तर आभार प्रदर्शन पंकज कासार यांनी केले .
या प्रसंगी वाघ यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती डॉक्युमेंट्री च्या माध्यमातून पडद्यावर दाखविण्यात आली . या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी मोठ्या संख्येने हजर होती .