जळगांव जिल्हामहाराष्ट्रराजकिय

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे जळगावात भरगच्च कार्यक्रम रविवारी जी.एस.ग्राऊंडवर जाहीर सभा : गुलाबराव देवकर

जिल्हयात महापाैर, जि.प.अध्यक्ष राष्ट्रवादीचाच हाेणार : संजय पवार

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१४ ऑगस्ट २०२५ :राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्रीअजीत पवार रविवार (ता.१७) जळगावात येत आहेत. शिवतीर्थ जी.एस.मैदानावर त्यांची जाहीर सभा हाेणार आहे. याप्रसंगी आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या सह अनेक पदाधिकारी नेते व कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश होणार असूनआगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महापाैर व जिल्हा परिषद अध्यक्ष  पक्षाचाच करण्याच्या दृष्टीने ही तयारी सुरू असल्याची माहीती पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत बाेलतांना दिली.

जळगाव येथील महामार्गा लगत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कार्याध्यक्ष योगेश देसले, असंघटित कामगार संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष पी.एस.पाटील,योगेश पाटील आदी उपस्थित होते

यावेळी सविस्तर माहिती देतांना माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी जळगाव दाैऱ्यावर येत आहेत. शनिवार (ता.१६)राेजी रात्री ते येणार असून जैन हिल्स येथे मुक्कामी असतील. रविवार सकाळी ७ वाजता चिंचोली येथील मेडिकल हब परिसराची पाहणी करतील, सकाळी आठ वाजता राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयात जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदािधकाऱ्यांशी चर्चा करतील. सकाळी दहा वाजता जिल्हयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी बारा वाजता जी.एस.मैदानावर जाहीर सभा हाेईल यावेळी काॅंग्रेसच्या प्रतिभा शिंदे आपल्या सहकाऱ्यांसाेबत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करतील या शिवाय इतरही प्रवेश असतील.

राज्यातील ह्या नेत्यांची राहणार उपस्थिती
उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या समवेत आदिवासी कल्याण मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा मंत्री माणिकराव काेकाटे,माजी मंत्री नवाब मलीक यावेळी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा राष्ट्रवादीमय करणार : संजय पवार
यावेळी बाेलतांना जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, आगामी जिल्हा परिषद,महानगरपािलकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दाैऱ्यात चर्चा हाेणार असून. जळगावचा महापाैर व जिल्हा परीषद अध्यक्ष तसेच सभापती हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच असतील एवढी ताकद आम्ही निवडणूकीत निर्माण करणार आहाेत.यावेळी त्यांनी एकेकाळी जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना राष्ट्रवादीचेच अनेक आमदार, लोकनियुक्त नगराध्यक्ष,सभापती असल्याची माहिती दिली. आम्ही महायुतीत निवडणूका लढण्याची तयारी करीत आहाेत. परंतु महायुती न झाल्यास स्वबळावर लढण्याचीही आम्ही तयारी करीत आहाेत.पुन्हा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमय जिल्हा करण्यासाठी आम्ही तयारी करीत आहाेत असेही सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button