जळगावअध्यात्मिकधार्मिक

हरि ओम नगरात आज पासुन श्रीमद् भागवत कथा

कथाकार ह.भ.प. देवदत्त महाराज जळगावकर

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २७ ऑक्टोंबर २०२५ : जळगाव येथील कानळदा रोडवरील हरि ओम नगर परिसरात महादेव मंदिराच्या प्रांगणात कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्तिक महिन्यातील या भागवत कथेच्या श्रवणाचे विशेष महत्त्व असून सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर ते रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दररोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती,दुपारी २ ते ५ वाजता श्रीमद् भागवत कथा, संध्याकाळी ६ वाजता हरिपाठ आणि रात्री ८.३० वाजता हरि कीर्तन संपन्न होणार आहे. कथेचे निरूपण ह भ प देवदत्त महाराज जळगावकर हे करणार असून

रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिंडी सोहळा होईल आणि सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता गोपाळकाल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल

दररोज जास्तीत जास्त भाविकांनी कथा, कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button