जळगांव जिल्हामहाराष्ट्रराजकिय

भाजपा कडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारींची घोषणा; जळगांव शहराचे प्रमुख राजुमामा भोळे

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती; जळगाव पूर्व (रावेर) चे नंदू महाजन तरजळगाव पश्चिमचे प्रमुख मंगेश चव्हाण ना.संजय सावकारे प्रभारी

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ६ नोव्हेंबर मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी आज जाहीर करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

घोषित यादीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख प्रमोद जठार तर प्रभारी नितेश राणे असतील. रत्नागिरी उत्तरचे प्रमुख विनय नातू व प्रभारी निरंजन डावखरे, तर रत्नागिरी दक्षिणचे प्रमुख अतुल काळसेकर व प्रभारी रामशेठ ठाकूर यांची निवड झाली आहे. रायगड उत्तरचे प्रभारी प्रशांत ठाकूर, रायगड दक्षिणचे प्रभारी सतिश धारप, ठाणे शहराचे प्रमुख संजय केळकर, तसेच ठाणे ग्रामीणचे प्रमुख कपिल पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

भिवंडीसाठी महेश चौघुले, मीरा-भाईंदरसाठी प्रमुख नरेंद्र मेहता व प्रभारी गणेश नाईक, नवी मुंबईसाठी संजीव नाईक, कल्याणसाठी नाना सूर्यवंशी, उल्हासनगरसाठी प्रदीप रामचंदानी, तसेच वसई-विरारसाठी प्रमुख राजन नाईक व प्रभारी डॉ. हेमंत सावरा यांची नियुक्ती झाली आहे. पालघर जिल्ह्याची जबाबदारी बाबाजी काठोळे, नंदुरबारसाठी प्रमुख विजय चौधरी व प्रभारी रक्षा खडसे, तर धुळे शहरासाठी अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणसाठी कुणाल पाटील व प्रभारी जयकुमार रावल अशी नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिक शहराचे प्रमुख राहुल ढिकले, नाशिक उत्तरचे डॉ. राहुल आहेर, नाशिक दक्षिणचे गिरीश पालवे व प्रभारी गिरीश महाजन, मालेगावचे प्रमुख दादा जाधव, जळगाव शहराचे प्रमुख राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) चे नंदू महाजन व प्रभारी संजय सावकारे, तसेच जळगाव पश्चिमचे प्रमुख मंगेश चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर शहराचे प्रमुख विक्रम पाचपुते, अहिल्यानगर उत्तरच्या प्रमुख नेहलता कोल्हे व प्रभारी राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर दक्षिणचे प्रमुख सुजय विखे पाटील, पुणे शहराचे रघुनाथ कुलकर्णी, पुणे उत्तर (मावळ) चे राम सातपुते, पुणे दक्षिण (बारामती) चे सचिन कल्याणशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे धैर्यशील कदम, सोलापूर शहराचे जयकुमार गोरे, सोलापूर पूर्वचे राम सातपुते, सोलापूर पश्चिम (माढा) चे सोनल कल्याणशेट्टी, तर साताऱ्याचे प्रभारी शिवेंद्रराजे भोसले असतील.

या सर्व नियुक्त्यांमुळे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा रणसंग्राम औपचारिकरित्या सुरू केला असून, प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि निवडणूक नियोजनासाठी स्वतंत्र जबाबदारी असलेले अनुभवी नेते नेमले गेले आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button