जळगांव जिल्हाक्राईम

मन्यारखेडा शिवारातील कुंटणखाना उध्वस्थ ; पाच तरुणींची सुटका, दोघांना अटक

नशिराबाद पोलिसांची कारवाई ; ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ७ नोव्हेंबर :
नशिराबाद प्रतिनिधी : एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रात्री साडेदहाच्या सुमारास जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारात धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींची सुटका करत दोन जणांनाअटक करून सुमारे ६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संबंधित ठिकाणी काही महिला आणि तरुणींना डांबून ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तत्काळ कारवाईची योजना आखली. जळगाव मानवी तस्करी विरोधी पथकाच्या (AHTU) मदतीने या ठिकाणी छापा टाकण्यात आला. छापादरम्यान घरातून पाच तरुणी आणि दोन चालक आढळून आले, तर दोन प्रमुख संशयितांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी राहुल पाटील (रा. जळगाव) आणि राम बोरसे (रा. जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चेतन माळी आणि श्याम बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलांची सुटका करून त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहाय्यक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार तसेच AHTU पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button