जळगावताज्या बातम्यामहापालिका निवडणुक

भाजपा बद्दल प्रचंड असंतोष;अपक्ष विनोद चौधरी यांच्यावर उमेदवारी मागे न घेण्यासाठी तेली समाजाचा मोठा दबाव

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ मधून युवा उद्योजक विनोद चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा ठाम निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्यानंतरही त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले विनोद चौधरी हे युवकांमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि जनहिताच्या कामांमुळे त्यांनी प्रभागात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत तेली समाजबांधवांसह अनेक कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांकडून ‘अपक्ष म्हणूनच लढा’ अशी आग्रही भूमिका व्यक्त केली जात असल्याचे चित्र आहे.

तेली समाजाचे राज्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संघटनेत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या विजय चौधरी दोन्ही असतांना सुद्धा केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाने जळगांव महापालिका निवडणुकीसाठी तेली समाजातील इच्छुकांना आश्वासने देऊन सुद्धा उमेदवारी दिली नाही.याचा प्रचंड राग आणि संताप समाजातून व्यक्त होत आहे.मतदानाच्या वेळेला अगदी टोकाची भूमिका घेण्याचे समाजातील दिग्गजांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपक्ष उमेदवार विनोद शांताराम चौधरी यांची भाजपचे दोन्ही आमदारांनी रात्री उशिरापर्यंत मनधरणी केली. मात्र विनोद चौधरी तेली समाजाच्या दबावामुळे उमेदवारीवर ठाम असून.कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा मनस्थितीत असून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button