
| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २४ : जळगाव येथील डॅा.यतीन बोरोले हे डि.आर.एन.बी (सुपरस्स्पेशालिटी गैस्ट्रोलॉजी )परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांनी डि.आर.एन.बी चे शिक्षण हे मुंबई येथील सुप्रसिद्ध एच.एन रिलायन्स हॉस्पिटल येथे घेतले असून त्यांना सुप्रसिद्ध डॉक्टर पद्मश्री अमीत मायदेव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ते जळगाव येथील डॉ.अजीत बोरोले व सौ.यामीनी बोरोले यांचे चिरंजीव असुन प्रख्यात न्यूरो सर्जन डॅा.केतन बोरोले यांचे लहान बंधू आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तसेच मित्र मंडळी व नातेवाईकांकडुन त्यांचे कौतुक होत असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







