लोकमाध्यम न्युज | जळगांव २४ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव – काही काळापासून भारतीय जनता पार्टी पासून दुरावलेल्या माजी नगरसेविका जयश्री पाटील व त्यांचे पती नितीन पाटील यांनी नुकताच आमदार भोळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, विधानसभा समन्वयक श्री. विशाल त्रिपाठी, जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव मुकुंद मेटकर, सचिन पानपाटील उपस्थित होते. यावेळी भाजपाचे मफलर देऊन उभयतांचे स्वागत करण्यात आले. पक्ष संघटनात्मक कार्य करण्यासाठी झोकून देणार असल्याचे जयश्री व नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.